आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा शेतक-याने बाइकला जोडला पंप, लिटरभर पेट्रोलमध्‍ये 26000 लिटर पाण्‍याचा उपसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर - इयत्‍ता बारावीपर्यंत शिकलेला युवा शेतकरी महेंद्र बीरडा याने पाणी आणि विजेची बचत करण्‍यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून पंप तयार केला आहे. याव्‍दारे तो केवळ 80 रूपयामध्‍ये त्‍याच्‍या 2 एकर शेतातील झाडांना पाणी देतो. त्‍याच्‍या या नवतंत्रामुळे पाणी आणि विजेची बचत होते.

कसे काम करते महेंद्रने तयार केलेले पंप...
महेंद्रने पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवले होते. मात्र शेतातील झाडांना पाणी देण्‍यासाठी त्‍याच्‍याकडे विज नव्‍हती. त्‍यानंतर त्‍याने देशी जुगाडाचा अवलंब करत हे तंत्रज्ञान शोधून काढले. दुचाकीच्‍या मागच्‍या चाकाशी त्‍याने पंप जोडला. बाइक स्टार्ट केल्‍यानंतर पंप तीन एचपी पावरने पाणी खेचू शकतो. झाडांना दिलेल्‍या पाण्‍याचा अपव्‍यय होऊ नये यासाठी त्‍याने झाडांजवळ पिशव्‍या बांधल्‍या.
- दुचाकीला जोडलेला पंप एक मिनीटाला 40 लिटर पाणी खेचतो.
- या तंत्राव्‍दारे एक लिटर पेट्रोलमध्‍ये 30 फुट खोल असलेले 26 हजार लिटर पाणी खेचता येते.
- या तंत्रासाठी विजेची गरज नाही.
- याच कामासाठी वीज वापरली तर महिन्‍याला 1500 रूपये खर्चावे लागतात.
अशी आहे प्रक्रिया
- सुरूवातील दुचाकीच्‍या मागच्‍या चाकातील हवा सोडली जाते.
- चाकावर चैन बसवून नंतर हवा भरली जाते. त्‍यामुळे चैन फिट होते.
- ही चैन पंपाला बसवलेल्‍या भिंगरीला जोडली जाते.
- पंपाला सामान्‍य प्रक्रियेप्रमाणे दोन पाइप आहेत.
- एक पाइप पाणी ओढतो. दुसरा पाणी झाडांना देतो.
महेंद्रने माहिती दिली...
- या तंत्राव्‍दारे100 फूट खोल पाणीही खेचल्‍या जाऊ शकते.
- 20 रूपयांच्‍या पेट्रोलमध्‍ये दररोज मी 5000 लीटर पाण्‍याचा उपसा करतो.
- 45 अयशस्‍वी प्रयोगानंतर माझा हा प्रयोग यशस्‍वी झाला.
पुढील स्‍लाड्सवर क्‍लिक करून पाहा, महेंद्र आणि त्‍याच्‍या टेक्‍नॉलॉजीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...