आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अजगराने नीलगाईचा बछडा गिळण्याचा केला प्रयत्न, वाचा पुढे काय झाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाली/जयपूर (राजस्थान)- येथील पाली जिल्ह्यातील एका गावात दैत्याकार अजगराने नीलगाईचा बछडा गिळण्याचा प्रयत्न केला. यावेळी बछडा मोठमोठ्याने ओरडत होता. आवाज ऐकून घटनास्थळी लोक जमा झाले. लोकांनी बछड्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजगराने बछड्याला पोटातून बाहेर काढले. पण या दरम्यान श्वास कोंडून बछड्याचा मृत्यू झाला होता.
रात्रीच्या आंधारत अजगर एका शेतात लपून बसला होता. त्याला नीलगाईचा बछडा दिसला. त्याने त्याच्याभोवती वेटोळे मारले. यावेळी नीलगाईचा बछडा मोठमोठ्याने ओरडू लागला. त्यामुळे घटनास्थळी लोक जमा झाले. त्यानंतर अजगराने बछड्याला गिळण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी लोकांचा गोंधळ वाढला होता. लोकांना बघून अजगर घाबरला. त्याने बछड्याला पोटातून बाहेर काढले. त्यानंतर लगेच पळून गेला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी हा अजगर मेलेल्या अवस्थेत झाडांमध्ये आढळला. त्याचा कशामुळे मृत्यू झाला याची माहिती मिळू शकली नाही. लोकांनी अजगर आणि नीलगाईच्या बछड्याला खड्डा करून जमिनीत गाडले.
पुढील स्लाईडवर बघा, हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचे फोटो....