आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rambag Palace Jaipur Get Top Position In Romance Hotals Rajasthan

रोमान्‍स करण्‍यासाठी प्रसिध्‍द आहे जयपूरचे हॉटेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- हॉस्पिट्यालीटी क्षेत्रामध्‍ये जयपूरच्‍या हॉटेलने अटकेपार झेंडा फडकावला असून, 2014 च्‍या 'ट्रॅव्‍हल साइट ट्रिप' पुरस्‍कारासाठी तीन हॉटेलांची निवड करण्‍यात आली आहे. राजस्‍थान मधील हॉटेलला विविध 50 पुरस्‍कार मिळणार आहेत. या पुरस्‍कारासाठी जयपूर मधील तीन हॉटेलांनी बाजी मारली आहे.
ट्रिप अँडवाइजरचे मॅनेजर निखिल गंजू यांनी सांगितले, चांगल्‍या दर्जाच्‍या हॉटेलांना हे पुरस्‍कार दिले जातात. पाच वर्षाला हे पुरस्‍कार देण्‍यात येतात. पुरस्‍काराचे 'सात' श्रेणींमध्‍ये विभाजन करण्‍यात आलेले आहे. बारगेन, (बेड अँड ब्रेक फास्‍ट इन ), फॅमेली, लग्‍जरी, रोमांस या पुरस्‍काराच्‍या श्रेणी आहेत. या प्रकारच्‍या श्रेणीमध्‍ये भारतातील 222 हॉटेल्‍स पात्र ठरल्‍या आहेत.
लग्‍जरी पुरस्‍कारासाठी जयपूरच्‍या 'ताज रामबाग पॅलेस' आणि 'द ऑबेरॉय राज विलास' या हॉटेलांची निवड झाली आहे. 'रोमान्‍स' पुरस्‍कारासाठी वरील दोन्‍ही हॉटेलसह 'रॉयल हेरिटेज हवेली' या हॉटेलची निवड झाली. 'टॉप' हॉटेलमध्‍ये 'राम बाग पॅलेस' आणि 'ऑबेरॉय' या हॉटेलची निवड करण्‍यात आली आहे.
राजस्थानच्या ऑबेरॉय ग्रुप, ताज ग्रुप, लीला ग्रुपच्‍या हॉटेल्‍सना वेगवेळ्या प्रकारचे 8 पुरस्‍कार मिळाले आहेत. हा पुरस्‍कार हॉटेलांनी ग्राहकांना उत्‍कृष्‍ठ सेवा पुरवल्‍याबद्दल दिला जातो.
रामबाग पॅलेस हॉटेलची, लग्‍जरी, रोमान्‍स, व टॉप हॉटेलच्‍या श्रेणीमध्‍ये निवड करण्‍यात आली आहे.
या श्रेंणीमध्‍ये निवड झालेल्‍या हॉटेल्‍स
लग्‍जरी 10 - ताज रामबाग पॅलेस,
लग्‍जरी 14 - द ऑबेरॉय राज विलास
रोमान्‍स 06 - ताज राम बाग पॅलेस
रोमान्‍स 11 - द ऑबेराय राज विलास
रोमान्‍स 23 - रॉयल हेरिटेज हवेली
टॉप हॉटेल्‍स 9 - ताज रामबाग पॅलेस
टॉप हॉटेल्‍स 19- द ऑबेरॉय राज विलास
रामबाग पॅलेस - जयपूरमधील फाईवस्‍टार हॉटेल असून या हॉटेलमध्‍ये 79 रूम आहेत. राजस्‍थानमध्‍ये राजेशाही असताना या हॉटेलमध्‍ये राजे-महाराजे थांबत असत. या हॉटेलचे बांधकाम राजमहालासारखे आहे. या हॉटेलची निर्मिती जयपूरचे महाराज मानसिंग यांनी केली होती. जगातील प्रसिध्‍द हॉटेलमध्‍ये रामबाग आजघडीलाही ओळखले जाते.
द ऑबेरॉय राज विलास-
32 एकरच्‍या आवारात वनराईमध्‍ये ही हॉटेल आहे. राजपूत राजेमहाराजे यांच्‍या जीवनशैलीचे दर्शन हॉटलमध्‍ये गेल्‍यानंतर होते. जगभरामध्‍ये ही हॉटेल प्रसिध्‍द असून इजिप्‍त, मॉरिशस, इंडोनेशिया, सउदी अरब या देशातील पर्यटक आनंद घेण्‍यासाठी व रोम्‍सास करण्‍यासाठी या हॉटेलमध्‍ये येतात.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा या हॉटेल्‍सचे छायाचित्रे...