आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PICS: जयपूरच्‍या स्‍वातंत्र्यपूर्व इतिहासाचे अविस्‍मरणीय क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर शहराचा आज 287 वा वर्धापन दिवस साजरा केला जात आहे. राजे-महाराज्‍यांचा पराक्रम आणि इतिहास या शहराला लाभला आहे. सिटी भास्‍करने वर्धापन दिनानिमित्त जयपूर शहराचे फेसबुक प्रोफाइल तयार केले आहे. या शहराचे ऐतिहासीक फोटो टाईमलाइनवर पोस्‍ट करण्‍यात आले आहेत. आज आम्‍ही तुमच्‍यासाठी या ऐतिहासीक शहराची माहिती देत आहोत.
18 नोव्‍हेंबर 1727 मध्‍ये सवाई जयसिंग दुसरे यांनी जयपूर शहराची स्‍थापना केली. रामसिंग यांनी 1835-80 काळात या शहराला गूलाबी शहर म्‍हणून ओळख निर्माण करून दिली. रामसिंग यांनी या काळात मुलींच्‍या शिक्षणाची सोय करण्‍याबरोबर मेडिकल शिक्षण, फोटोग्राफी प्रशिक्षणाची सुविधा निर्माण केली. रामसिंग यांच्‍या काळातील 2022 फोटोच कलेक्‍शन आजही सिटी पॅलेसमध्‍ये पाहायला मिळते.
तीन वेळा बदलले पिंक शहराचे नाव-
या शहराचे आजपर्यंत तीनवेळा नाव बदलले आहे. सुरूवातीला सवाई जयसिंग द्वितीयने सवाई जयपूर असे नाव ठेवले. सवाई मोधोसिंग यांच्‍या काळापर्यंत या नावाने शहराला ओळखले जाऊ लागले. 1798 मध्‍ये जायनगर आणि जैपूर नावाने शहरला ओळखत असत. 1829 मध्‍ये कर्नल जेम्‍स टॉड यांनी जैपूरचे जीपुअर असे नामकरण केले. 1933 मध्‍ये एन्‍डी.सी. वॉकरने यांनी जयपूर शहराला जायपूर नाव दिले.
संदर्भ- Pt. Jawaharlal Nehru @jawahar
From : 'Discovery Of India'

पुढील स्‍लाईडवर पाहा जयपूरची ऐतिहासीक छायाचित्रे...