आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बल्लभगड दंगल: तलवारी, परशू, देशी पिस्तुल घेऊन 2000 लोकांनी केला होता हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरीदाबाद- हरियाणातील बल्लभगड येथील अटाली गावात झालेल्या दंगली प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दंगलीच्या वेळी सुमारे 2000 लोकांनी तलवारी, परशू, देशी पिस्तुल घेऊन हल्ला केला होता असे यात नमुद करण्यात आले आहे. मशिदीच्या बांधकामावरुन दोन समुदायांमध्ये संघर्षाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून यावर वाद सुरु आहे. दंगलीनंतर अनेक मुस्लिम कुटुंबाना घर सोडून पळावे लागले आहे. दंगल भडकण्यापूर्वी घटनास्थळावरुन पोलिसांना हटविण्यात आले होते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
हे लिहिले आहे एफआयआरमध्ये
ही दंगल पूर्वनियोजित होती. हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये संघर्षाचे वातावरण तयार व्हावे यासाठी कट रचण्यात आला होता. मशिदीवर हल्ला करण्यासह काही घरांचे नुकसान करण्याचा काही लोकांचा उद्देश होता. सोमवारी मुस्लिम समुदायाचे लोक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले तेव्हा हिंसाचार सुरु झाला. काहीच वेळात तब्बल दोन हजार नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांच्या हातात शस्त्रे होती. पोलिस तक्रारीत सहा लोकांचे नाव घेण्यात आले आहे. त्यांनी शस्त्रांनी मुस्लिम नागरिकांवर हल्ला चढविला होता. काही लोकांनी यावेळी हवेत गोळीबार केला. यातही काही जण जखमी झाले. त्यानंतर 20 घरे, तीन कार, टॅक्टर ट्रॉली, दोन टेम्पो, 15 दुचाक्या आणि दोन दुकानांना आग लावण्यात आली.
मजुराला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न
नईमु्द्दीन नावाच्या मजुराला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. यात तो जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सुरवातीला त्याला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर कुऱ्हाडीने पायाचे बोटे छाटण्यात आली.
पुढील स्लाईडवर बघा, घटनेशी संबंधित फोटो...