आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राजस्थानमध्ये एकिकडे रेतीच्या वादळाचे तांडव तर दुसरीकडे मुसळधार पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/अजमेर- राजस्थानमध्ये प्रकृतीचे दोन वेगवेगळे रंग दिसून येत आहेत. एकिकडे रेतीच्या वादळाचे तांडव सुरु असून दुसरीकडे मुसळधार पाऊस सुरु आहे. या दोन्ही नैसर्गिक संकटांमुळे जिवनमान प्रभावित झाले आहे. गावांशी संपर्क तुटला आहे. जैसलमेरमध्ये आलेल्या रेतीच्या वादळाने लोकांना श्वास रोखून धरावा लागला होता. या वादळाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. पण लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नाल्यात वाहून गेला तीन वर्षांचा चिमुकला
कोटामध्ये मंदिराजवळ असलेल्या नाल्यात वाहून गेल्या ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मोठा भाऊ अजयसोबत चिमुकला कृष्णा पाण्याच्या प्रवाहातून चप्पल काढत होता. यावेळी त्याचा हात सुटला. तो पुराच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी त्याला वाचवता आले नाही. जवळपास कुणी मोठेही नव्हते. अजयने पळत जाऊन घरी असलेल्या आईला माहिती दिली. पण तोपर्यंत कृष्णाचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेहही सापडलेला नाही.
ठिकठिकाणी जोरदार पाऊस
राजस्थानमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राजस्थानमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राजस्थानमध्ये आलेले नैसर्गिक संकट...