आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय आहे संथारा, जैन धर्मातील लोक या प्रथेला पवित्र का मानतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- जैन धर्मातील सर्वांत जुन्या संथारा प्रथेवर (सल्लेखना) राजस्थान हायकोर्टाने स्थगिती बंदी घातली आहे. याला कायद्याने गुन्हा घोषित केले आहे. या निर्णयानंतर जैन समाजात संतापाची लाट उठलेली आहे. या समाजातील लोक या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार बोलून दाखवत आहेत. शिवाय या विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमिवर जाणून घेऊयात, की काय आहे संथारा... याबदद्ल जैन धर्मात काय सांगितले आहे.
जैन समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा आहे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्राणत्याग करावा असे वाटते तेव्हा तो एखाद्या खोलीत स्वतःला बंद करतो. अन्न-पाणी घेत नाही. जैन शास्त्रांमध्ये अशा प्रकारच्या मृत्यूला समाधिमरण, पंडितमरण किंवा संथारा म्हटले जाते. याचा अर्थ जीवनाच्या अखेरच्या क्षणी तप-विशेषची आराधना करणे. जैन समाजात अशा प्रकारच्या मृत्यूला महोत्सवही म्हटले जाते.
जेव्हा जीवनात काही राहत नाही
जैन धर्मात शास्त्रानुसार निष्प्रतिकार-मरण विधी आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा न करता उपचार शक्य असतील तरच ते करण्याची अनुमती देण्यात आली आहे. तसे शक्य नसेल तर अन्न-पाणी त्यात करुन परमात्मात लीन होण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. त्यालाच संथारा म्हटले जाते.
(संदर्भ- जैन-ज्ञान-दर्शन, वेबसाइटवर रामपूरचे प्रा. सुदीप कुमार जैन यांनी लिहिलेल्या लेखानुसार)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा संथाराची संपूर्ण प्रक्रिया...
बातम्या आणखी आहेत...