आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीनदयालजींच्या मारेकऱ्यांचा शोध लागायला हवा : शुक्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - भाजपचे पितामह म्हणून असलेल्या दीनदयाल उपाध्याय यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागायला हवा, अशी इच्छा त्यांचे बंधू प्रभुदयाल शुक्ला यांनी व्यक्त केली आहे. ८९ वर्षीय शुक्ला सध्या मुंबईच्या जगजीवनराम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. बुधवारी सायंकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलगी मधू शर्मा यांच्याजवळ प्रभुदयाल शुक्ला यांनी आपली अंतिम इच्छा व्यक्त केली आहे. राजस्थानच्या कोटा येथे राहणाऱ्या मधू शर्मा यांनी प्रभुदयाल यांची इच्छा जाहीर केली आहे. दीनदयाल उपाध्याय यांच्या मारेकऱ्यांचा शोध कधी लागणार? त्यांना न्याय मिळण्यापूर्वीच मी जगाचा निरोप घेईल काय? असे प्रश्न त्यांनी विचारल्याचे शर्मा यांनी सांगितले.

सध्या ते बोलू शकत नाहीत मात्र, परिचितांना ओळखू शकतात. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचा सरकारने शोध लावला आहे. मात्र, आपल्या भावाच्या मारेकऱ्यांचा अद्यापही काहीच पत्ता नाही. नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे आता तरी याबाबत काही पुढाकार घेण्यात यावा.
आजोबांकडे पालनपोषण
पं.उपाध्याय तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या भावाचेही वयाच्या पाचव्या वर्षीच निधन झाले. तेव्हा त्यांच्या आजोबांनी गंगापूरसिटीच्या धानक्या गावात पं. उपाध्याय यांचे पालनपोषण केले. नंतर पंडितजी कानपूरमध्ये गेले. या ठिकाणी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख आणि जगदीश प्रसाद माथुर यांच्यासोबत काम केले.

१९६८ ची घटना
मधू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी १९६८ रोजी मुगलसराय येथील रेल्वे ट्रॅकवर पं.उपाध्याय यांचे प्रेत सापडले होते. तेव्हा प्रभुदयाल शुक्ला हे रेल्वेत गार्ड होते आणि रेल्वे घेऊनच दिल्लीला गेले.

होते. दरम्यान, विचारपूस करायला भाजपचा एकही नेता न आल्याचे दु:खही शर्मा यांनी व्यक्त केले आहे.