आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांपूर्वी पश्चिमेकडून उगवला सूर्य, आज वाचकांच्या जीवनाचा भाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर | १९ डिसेंबर १९९६ रोजी “अब सूरज उगेगा पश्चिम से, जयपूर के आसमान से ‘ अशा आत्मविश्वासाने भास्करने जयपूरमध्ये ऐतिहासिक सुरुवात केली होती. पहिल्याच दिवसापासून क्रमांक १ चे वृत्तपत्र असलेल्या भास्करने एक नवा इतिहास निर्माण केला आणि या प्रवासास या वर्षी २० वर्षे पूर्ण होत आहेत.
वाचकांच्या मर्जीनुसार चालणाऱ्या वृत्तपत्राचे हे ऐतिहासिक यश संस्मरणीय करण्यासाठी भास्करने जयपूरमध्ये ९ दिवसांच्या भास्कर उत्सवाचे आयोजन केले आहे. भास्कर उत्सवात ९ दिवस शहरातील विविध स्तरांतील वर्गासाठी भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.
चित्रपट निर्माता आणि सुपरस्टार आमिर खानसह नवे बिझनेस गुरू बाबा रामदेव, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक फराह खान, प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी, गायक कैलाश खेर, शेफ संजीव कपूर, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे, महाकवी संमेलन, मुलांसाठी पेंटिंग आणि घोषवाक्य स्पर्धांबरोबरच सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान अाणि चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ हे या उत्सवात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या मालिकेचे मुख्य प्रायोजक मिराज ग्रुप आणि सादरकर्ते बीएसएनएल हे आहेत.

उत्सवाचे आकर्षण
-१५ डिसेंबर - बिझनेस टॉक विथ बाबा रामदेव
-६ डिसेंबर- खाणे आणि गाणे, संजीव कपूरसोबत
-१६ डिसेंबर - मार्केटिंगचे फंडे - पीयूष पांडे
-१७ डिसेंबर - संस्मरणीय टॉक शो विथ आमिर खान
-१९ डिसेंबर - म्युझिकल नाइट विथ कैलाश खेर
-२० डिसेंबर - म्युझिक डान्स कॉन्सर्ट टायगर श्रॉफ आणि सुनिधी चाैहान
- २१ डिसेंबर - मीडिया सेमिनार विथ अर्णब गोस्वामी
- २३ डिसेंबर - १५ हजार मुलांसोबत पेंटिंग अँड स्लोगन कॉम्पिटिशन
बातम्या आणखी आहेत...