आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Three District Collectors In Rajasthan Disciplined Officers

राजस्थानचे 3 कलेक्टर, एक उचलते कचरा तर दुसरा पहाटे 4 वाजता जातो गावांमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांसवाडा/नागौर/अजमेर- राजस्थानमधील तीन कलेक्टर सध्या चर्चेत आहेत. त्यातील एक चक्क कचरा उचलण्यासाठी आणि स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रसिद्धी झोतात आली आहे तर एक कलेक्टर सकाळी चार वाजताच शासकीय कामकाज सुरु करतो. या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्तच लावली नाही तर एक आदर्श घडवून दिला आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांची माहिती देणार आहोत.
1- आरुषी मलिक आहेत स्वच्छता दूत
अजमेरच्या कलेक्टर आरुषी मलिक यांनी डिजिटल सहेली योजना लॉंच केली आहे. या अंतर्गत महिलांना निःशुल्क कॉम्प्युटर ट्रेनिंग दिले जाते. या योजनेवर सरकार रुपयाची खर्च करीत नसून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ती राबवली जात आहे. आरुषी यांची अजमेरला बदली झाली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम त्यांचे कार्यालय स्वच्छ केले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या स्वच्छता अभियान राबवितात. रस्त्याने जात असतील आणि त्यांना कचरा दिसला तर त्या कुणालाही न सांगता स्वतः हाताने तो उचलतात. त्यांना स्वच्छतेसाठी ओळखले जाते.
पुढील स्लाईडवर वाचा, राजस्थानच्या इतर दोन कलेक्टरची माहिती... यांनी घडवला आहे आदर्श....