जयपूर - कुत्रा तोफ चालवतो या गोष्टीवर सहजासहजी कुणाचा विश्वास बसणार नाही. पण, अलवरच्या बाला किल्ल्याजवळ असलेल्या तोप कारखान्यात चक्क एक कुत्रा तोफ चालवत असल्याचा इतिहास आहे. बाला किल्ल्यापासून सुमारे दोनशे मिटर अंतरावर रस्त्याच्या बाजुला खंडहरनुमा नावाची इमारत आहे. या इमारतीत राजांच्या शासनकाळात विविध प्रकारच्या तोफा तयार केल्या जात होत्या. येथे तयार झालेल्या तोफांची चाचणीही याच ठिकणी होत असे.
चाचणीदरम्यान तोफांच्या आवाजाचा, स्फोटाचा मनुष्यावर विघातक परिणाम होत होता. त्यामुळे एका कुत्र्याला प्रशिक्षण देण्यात आले. व्हिक्टर असे या कुत्र्याचे नाव होते. हा कुत्रा तोफ चालवल्यानंतर तेथे असलेल्या पाण्याच्या कुंडात झेपावत होता.
तोफेच्या स्फोटात झाला होता मृत्यू
एकदा या कारखान्यात आशिया महाद्वीपची दूसरी सर्वात मोठी तोफ बनवण्यात आली होती. या तोफेचे परीक्षणही व्हिक्टर नावाच्या कुत्र्यालाच करायचे होते. तोफ पेटवून दिल्यानंतर व्हिक्टर पाण्याच्या हौदात उडी घेत होता. पण त्याआधीच तोफेचा स्फोट झाला नि व्हिक्टरही यात दगावला. या कुत्र्याच्या स्मृतीनिमित्त तोफखाना परिसरात त्यांची समाधी बनवण्यात आली आहे. व्हिक्टरचे नाव इतिहासात अमर झाले.
पुढील स्लाइड्समध्ये वाचा, किल्ल्याला नाव दिले कुवारा किल्ला, पाहा कुत्रा चालवत असलेल्या तोफेचे फोटो..