आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Team Has Saved Thousands Snake And Other Animals Life

PICS: टिव्ही शोमुळे हे बनले खतरो के खिलाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानमधील अल्वर शहरात राहणा-या विवेक जयस्वाल याने गेल्या सहा वर्षांत त्याच्या मोहिमेतून तीन हजारपेक्षाही जास्त प्राण्यांचा जीव वाचवला आहे. विवेकने एकट्याने हाती घेतलेल्या मोहिमेत आता त्याचे 15 साथीदार मदत करीत आहेत. विशेष म्हणजे विवेक हे काम करण्यासाठी पैसे घेत नाही.

विवेकला लहानपणापासूनच प्राण्यांची ओढ आहे. कॉलेजमध्ये असतानाही विवेकने वाइल्ड लाइफची कित्येक पुस्तके वाचली आहेत. सहा वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफी चॅनलवर सरपटणा-या प्राण्यांचे तज्ज्ञ असणा-या डॉ. ब्रैंडी बार यांचा प्रोग्राम पाहताना विवेकला आपणही असे करावे वाटले. साप पकडण्याचे तंत्र विवेकने टिव्हीवरूनच आत्मसाद केले.

विवेक एकदा रस्त्यावरून जात असताना रसल वायपर नावाच्या सापाला लोक मारत होते. साप पळण्याचा प्रयत्न करीत होता. विवेक तिकडे गेला आणि छडीच्या मदतीने त्याने सापाला उचलले. त्यानंतर त्याला जंगलात सोडले. यानंतर प्राण्यांना वाचवण्याचा कार्यक्रम नित्याचाच झाला. विवेक सांगतो, की आतापर्यंत मी आणि माझ्या साथिदारांनी मिळून अडीच हजारांपेक्षाही जास्त सापांना जीवनदान दिले आहे.
विवेक आणि त्याची टीम आता साप पकडण्यात तज्ज्ञ झाले आहेत. या टीम मधील डॉ. सुनील, नेव्हीमध्ये काम करणारे भारत, कमल मीणा आणि सुरत हे विषारी साप पकडण्यात अगदी निष्णात झाले आहेत.