आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Sisters Become Sadhvi In Jain Community In Udaipur

PICS: नववधूसारख्या सजून आल्या दोन बहिणी, वैराग्य स्विकारुन झाल्या साध्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(साध्वी होण्यापूर्वी आणि नंतर घेतलेला फोटो.)
उदयपूर (राजस्थान)- पानीपत येथील प्रीति आणि तिची सख्खी बहिण सोनिया शर्मा यांनी जैन आगवती दिक्षा ग्रहण केली. नवदिक्षिता प्रीति हिला साध्वी सुप्रेक्षा श्री आणि सोनिया हिला साध्वी संप्रेक्षा श्री अशी नावे देण्यात आली. यापूर्वी महानिष्क्रमण यात्रा शहरातील वेगवेगळ्या भागांमधून गेली. यावेळी त्यांचे कुटुंबीय हत्ती आणि घोड्यांवर स्वार होते. रथात बसलेल्या प्रीति आणि सोनिया यांनी अगदी नववधूप्रमाणे श्रृंगार केला होता.
यात्रा जेव्हा एका शाळेच्या बाहेर आली तेव्हा कुटुंबीयांनी दोघींना उचलले आणि दिक्षा स्थळी घेऊन गेले. कुटुंबीय, जैन संघ आणि साध्विंच्या परवानगीने दिक्षा विधी सुरु करण्यात आला. यानंतर दोघींनी वैराग्य पथासाठी संतांचे श्वेत वस्त्र धारण केले. यासाठीही कुटुंबीयांनी त्यांना उचलले होते. दोघी साध्वी डॉ. राजश्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, या सोहळ्याची बोलकी छायाचित्रे...