आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Stories Building Has Been Constructed On 2.5 Feet Plot In Jaipur

अडीच फुटांच्या भींतीवर बांधले सिमेंटचे मजबूत घर, आत आहे एक खोली, किचन आणि बाथरुम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- गोविंदनगर पूर्व येथील बास बदनपुराजवळ असलेल्या बीच सोसायटी रोडशेजारी एका व्यक्तीने चक्क अडीच फुटांच्या भींतीवर सिमेंटचे मजबूत घर बांधले आहे. नागतलाई नाल्याच्या बाजूला सुमारे दहा फुट रुंदीचा पक्का रस्ता आहे. त्याच्या आणि नाल्याच्या मध्ये असलेल्या अडीच फुटांच्या भींतीवर हे सिमेंटचे घर बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दुमजली घरात एक खोली, किचन आणि बाथरुम आहे. ग्राऊंड फ्लोअरला केवळ जिना तर पहिल्या मजल्यावर राहण्यासाठी खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
अडीच फुट जागेवर बिम बांधून रस्त्याच्या वर पाच फुट आणि नाल्याच्या बाजूला पाच फुट बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. या रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष या इमारतीकडे जाते. पण महानगरपालिकेचे अद्याप याकडे लक्ष गेलेले नाही.
पुढील स्लाईडवर बघा, या अनोख्या इमारतीची छायाचित्रे...