उदयपूर (राजस्थान)- उदयपूर राजघराण्याचा राजकुमार लक्ष्यराजसिंह ओडिसाच्या राजघराण्याची राजकुमारी निवृत्तीकुमारीसिंह हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दोघे भेटले आणि प्रेमात पडले. अखेर प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले.
लक्ष्यराजसिंह याचे सासरे कनकवद्रधनसिंह भाजपच्या ओडिसा शाखेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ओडिसाच्या सरकारमध्ये तीनपेक्षा जास्त वेळा ते मंत्री राहिले आहेत. सासू संगीतासिंहसुद्धा दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. दुसरीकडे लक्ष्यराजसिंह याचाही पंतप्रधान
नरेंद्र मोदींपासून सलमानखानपर्यंत सर्वांशी परिचय राहिला आहे.
एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संस्थापक अरविंदसिंह मेवाड हे लक्ष्यराजसिंह याचे वडील आहेत. लक्ष्यराजसिंह याने ऑस्ट्रेलियातून बिझनेस आणि हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली असून उदयपूर क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे.
पुढील स्लाईडवर बघा, उदयपूर राजघराण्याचा राजकुमार लक्ष्यराजसिंह याचे वेगवेगळ्या सेलेब्जसोबत फोटो...