आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बेरोजगारीचा विळखा, नोकरीसाठी ट्रेनच्या छतावर बसून केला प्रवास, इंजिनवरही चढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीमकाथाना/सीकर- राजस्थान वन विभागाकडून वनरक्षक पदासाठी काल (सोमवार) परिक्षा घेण्यात आली. पेपर सोडविल्यानंतर आलेल्या उमेदवारांनी चक्क रेल्वेच्या छतावर बसून धोकादायक पद्धतीने प्रवास केला. एका नोकरीसाठी चक्क जीव धोक्यात टाकला. केवळ डब्यांवरच नव्हे तर इंजिनवरही उमेदवार चढले. बेरोजगारीचा विळखा आपल्या समाजाला कसा बसलाय हे या निमित्ताने अधोरेखित झाले.
रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली
- परीक्षा देऊन रेल्वे स्थानकावर आलेल्या तरुणांनी फार गोंधळ घातला. काही ठिकाणी महिलांसोबतही गैरवर्तन केले.
- ठिकठिकाणी गाडीची चेन ओढल्याने प्रवासाला बराच उशीर झाला.
- या तरुणांमुळे इतर प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला.
- त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपी जवान तैनात करण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर बघा, देशातील बेरोजगारीचे वास्तव मांडणारे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...