आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मुख्यमंत्री रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा दुकानात घेतात चहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी प्रजासत्ताकदिनी सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. बडी चौपड येथे ध्वजारोहण केल्यावर शासकीय निवासस्थानी परतत असताना त्यांनी वाहनांचा ताफा मध्येच रोखून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा दुकानात चाहा घेतला. एकिकडे स्वतःला आम नागरिक म्हणवून घेणारे आम आदमी पक्षाने नेते "खास" होताना दिसत असताना वसुंधरा राजेंनी मुख्यमंत्र्याने किती आम असावे हे सिद्ध करून दाखविले आहे.
अंगीठीजवळ असलेल्या या चहाच्या दुकानात वसुंधरा राजेंनी चक्क काचेच्या ग्लासमध्ये चहा घेतला. चहावाल्यांबाबत माझ्या मनात खुप आदर आहे, असे राजे यावेळी म्हणाल्या. यावेळी जेव्हा राजेंनी अगदी सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे चहाची ऑर्डर दिली तेव्हा या दुकानात चहा घेणाऱ्यांचा आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
यावेळी राजेंनी चहाच्या दुकानात असलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे नगर विकास विभागाचे सचिव डी. बी. गुप्ता यांना आदेश दिले.