आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasundhra Raje Meet Shabana Azmi In Litrature Fest

वसुंधरा राजेंनी शबाना आझमींचा पकडला हात, बघा कसे झाले दोघींचे मनोनिलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जयपूर लिटरेचर फेस्टीव्हल' हा साहित्यिक आणि पुस्तकप्रेमींच्या आकर्षणाचा विषय असतो. या वर्षी मात्र या फेस्‍टीव्‍हलमध्‍ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. फेस्‍टीव्‍हलच्‍या उद्धाटनासाठी राजस्‍थानच्‍या मुख्‍यमंत्री वसुंधरा राजे यांची उपस्थिती उल्लेखनिय होती. कार्यक्रमासाठी आलेल्‍या जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांचे वसुंधरा यांनी स्‍वागत केले. यावेळी शबानाचा हात हातत घेऊन आस्थेवाइकपणे चौकशी केली.
पाच दिवस चालणा-या 'जयपूर लिटरेचर फेस्टीव्हल'ची सुरूवात गीतकार प्रसून जोशींच्‍या मैफीलने झाली. या कार्यक्रमासाठी देशभरातील 400 पेक्षा जास्‍त साहित्‍यीक उपस्थित राहणार आहेत. फे‍स्‍टीव्‍हलच्‍या पहिल्‍या दिवशी 31 सेशन पार पडली. यामध्‍ये 'तारे जमीं पर' या सेशनमध्‍ये यतींद्र मिश्र आणि प्रसून जोशींचा परिसंवाद आणि कवितावाचन झाले.
नायपॉल यांना अनावर झाले अश्रू-
फ्रन्‍ट लॉनवर सुरू असलेल्‍या कार्यक्रमात नोबेल पुरस्‍कार विजेत व्‍ही.एस. वी एस नायपॉल यांच्‍या 'अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास' या पुस्‍तकावर चर्चा सुरू असताना भावनीक झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या डोळ्यात अश्रू आले.

पुढील 'जयपूर लिटरेचर फेस्टीव्हल' ची छायाचित्रे...