आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VASUNDHRA RAJE TEACH TEACHERS OF SCHOOL News In Marathi

QUEEN & CM वसुंधरा राजेंनी गरीबाच्या घरी चटणी, कांद्यासोबत खाल्ली भाकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- उदयपूर येथील भादसोडामधील बंजारा समाजाच्या वस्तीत जाऊन राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि महाराणी वसुंधरा राजेंनी चटणी भाकरी खाल्ली. )
उदयपूर (राजस्थान)- 'सरकार आपके द्वार' या अभियानातंर्गत राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि महाराणी वसुंधरा राजे सिंधिया सध्या वेगवेगळ्या गावांना भेटी देत आहेत. यावेळी दिरंगाई करणाऱ्या किंवा कामात कसुर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या चांगलेच फैलावर घेत आहेत. यावेळी आपल्या श्रीमंतीचा जराही आव न आणता गरीबांच्या घरी जाऊन चटणी, कांद्यासह भाकरी खात आहेत.
मिरागंज प्राथमिक शाळेला वसुंधरा राजेंनी भेट दिली. यावेळी हजेरी पटावर 16 विद्यार्थी उपस्थित असल्याची नोंद होती. पण शाळेत केवळ 11 विद्यार्थी उपस्थित होते. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवण्यात आले होते. यावेळी राजेंनी पाचवीच्या विद्यार्थ्याला पाचचा पाढा म्हणण्यास सांगितले. पण त्याने पाढा म्हणण्यात चुक केली. त्यानंतर दुसऱ्या मुलाला पुस्तक वाचण्यास सांगितले. तर त्याला पुस्तक वाचता आले नाही.
यावर राजेंनी नाराजी व्यक्त करीत शिक्षक रामलाल रैगर यांना चांगलेच दटावले. तुम्हाला पगार किती मिळतो, असे विचारले. यावर शिक्षकाने 40 हजार असे उत्तर दिले. त्यावर राजे म्हणाल्या, की एवढा पगार घेता तरी शैक्षणिक स्तर एवढा खालावला आहे. तुमच्यापेक्षा खासगी शाळेत शिकवणारे शिक्षक बरे. तुम्ही चांगले शिकवत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यानंतर राजेंनी शिक्षकाला लगेच निलंबित आणि बीडीओला चार्जशिट केले.
वसुंधरा राजेंनी शाळेला भेट दिली आणि गरीबाच्या घरी चटणी-भाकरी खाल्ली....पुढील स्लाईडवर क्लिक करा...