आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, पिल्लासाठी तिने झोका झाडाले टांगला, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्किटेक्‍टची कला फक्‍त माणसांमध्‍ये नाही तर प्राण्‍यामध्‍येही असते हे वारंवार सिद्ध झाले आहे. माणसाला जशी निवा-याची गरज असते, तशीच गरज पक्षांनाही असते. पावसाळ्याच्‍या सुरूवातीला पक्षांची लगबग सुरू होते. ही लगबग असते, निवारा करण्‍याची, पावसापासुन बचाव करण्‍याची. माणसासारखा भविष्‍याचा विचार प्राणीही करत असतात. असे म्‍हटले तर धाडसाचे ठरणार नाही. पावसापासून आपल्‍या पिलांचे रक्षण करण्‍यासाठी पक्षी घरटे तयार करतात. घरटे तयार करण्‍यासाठी विविध प्रकारच्‍या पक्षांची वेगवेगळी कला आहे. सर्व पक्षांत सर्वात चांगले घरटे तयार करणारा पक्षी म्‍हणून 'सुगरण' या पक्षाला ओळखले जाते.
सुगरण नर पक्षी मादी सुरगरणीला लुभावण्‍यासाठी सुंदर घरटे तयार करतो. एकाच झाडावर अनेक खोपे तयार करण्‍याचे काम हे पक्षी करतात. यावेळी मादा सुगरण पक्षी कशा पद्धतीने खोपा तयार करण्‍यात येतो, याचे निरिक्षण्‍ा करते. सुगरण पक्षी खोपा तयार करत असताना आमच्‍या छायाचित्रकारे घेतलेली काही छायाचित्रे आज आम्‍ही तुमच्‍यासाठी देत आहोत...
पुढील स्‍लाईडवर पाहा, खोपा तयार करतानाची कला...