आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशामध्ये चौथ्या टप्प्यासाठी 61% मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनउ- उत्तर प्रदेशात गुरुवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा मतदारसंघासाठी ६१ टक्के मतदान झालेे. त्यात राज्याच्या १२ जिल्ह्यातील १.८४ कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला.

गुरूवारी सकाळी मतदानाला काहीशी मंदगतीने सुरुवात झाली होती. परंतु नंतर  मतदान केंद्राबाहेर रांगाचा रांगा दिसून आल्या. बाराही जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मतदान शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले. मतदान असलेल्या जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली होती. रायबरेली, प्रतापगड, कौशंबी, अलाहाबाद, जालोन, झांसी, ललितपूर, माहोबा, बांदा, हमिरपूर, चित्रकूट व फतेहपूर जिल्ह्यांत ही प्रक्रिया पार पडली. 

चौथ्या टप्प्यात ६८० उमेदवार रिंगणात होते. बसपने चौथ्या टप्प्यातील सर्वच्या सर्व जागी उमेदवार उतरवले होते. भाजपचे ४८ उमेदवार रिंगणात होते. भाजपचा सहकारी पक्ष अपना दलने सहा जागा लढवल्या. सपाचे ३० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
 
काँग्रेसचे २५ उमेदवार आहेत. दरम्यान, यूपीत सात मतदारसंघात निवडणूक होत असून आणखी तीन मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे. २७ फेब्रुवारी, ४ मार्च व ८ मार्च रोजी मतदान होणार असून ११ मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
 
२०१२ मध्ये सपाचे वर्चस्व
उत्तर प्रदेशच्या २०१२ मधील निवडणुकीत या पट्ट्यात समाजवादी पार्टीचे वर्चस्व राहिले होते.  ५३ पैकी २४ जागा सपाला मिळाल्या होत्या. भाजप-५, बसप-१५, काँग्रेस-६ इतर-३ जण विजयी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...