आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅसेंजर ट्रेनमध्ये पिशवीत मिळाली 5 दिवसांची मुलगी, देव बनून आला ठाणे हवालदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपुर : खजुराहो पॅसेंजर ट्रेनमध्ये पाच दिवसांची मुलगी पिशवीत सापडली. या नवजात मुलीला जीआरपी पोलिसांनी गोविंदपुरी पोलिस स्टेशनच्या हवाली केले. या मुलीची तब्येत नाजुक असल्याचे सांगितले आहे. तिला तात्काळ दवाखाण्यात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतू ते सापडले नाहीत. देव बनू आला ठाणे हवालदार...
- गोविंदपुरी स्टेशनमध्ये तैनात असलेला ठाणे हवालदार अमितनुसार, शनिवारी प्लॅटफॉर्म नंबर दोनवर खजुराहो पॅसेंजर 54161 उभी होती.
- 'मी तिथून जात होतो, माझ्या मनात काय आले माहित नाही, मी डब्यात चढून सर्व काही ठिक आहे का ते पाहू लागलो. तेव्हा मला पिशवी दिसली ते पाहून मी हैराण झालो.'

- 'तहान-भुकेमुळे मुलीचे ओठ पांढरे झाले होते. मी तात्काळ तिला पिशवीतून काढले आणि पाणी पाजले. नंतर दूधाची व्यवस्था केली. नंतर मला बरे वाटाले.'

 

नंतर चाइल्ड लाइनकडे सुपर्द केली मुलगी
- यानंतर त्यांनी चाइल्ड लाइन आणि आपल्या जीआरपी इंस्पेक्टरला याची सूचना दिली. नंतर चाइल्ड लाइनची मेंबर संगीता सचानकडे तिला सुपर्द केले.
- मुलीची परिस्थिती गंभीर होती. यामुळे चाइल्ड लाइनच्या टीमने तिला हॅलट हॉस्पिटलच्या बाल रोग विभागात दाखल केले.
- डॉक्टर म्हणाले - डॉक्टर म्हणाले, योग्य वेळी तिच्यावर उपचार झाले नाही, तर ती जिवंत राहणे अवघड होते. मुलीचे वजन फक्त 1 किलो 500 ग्राम होते.
- सचाननुसार, मुलगी फक्त चार ते पाच दिवसांची आहे. जर लोकांना मुलीला पाळायचे नाही तर अनाथ आश्रम किंवा चाइल्ड लाइनला संपर्क करु शकता. हे खुप वाईट काम आहे.

बातम्या आणखी आहेत...