मुरादाबाद- उत्तर प्रदेशात गॅंगरेपचे अनेकानेक प्रकरण उघडकीस येत असताना या नवीन प्रकरणाने पोलिसांची झोप उडाली आहे. छेडछाडीची पोलिस तक्रार दिल्याने आरोपींनी नर्स म्हणून नोकरीत करीत असलेल्या तरुणीचे अपहरण केले. तिच्यावर तब्बल तीन दिवस गॅंगरेप केला. त्यानंतर धावत्या कारमधून तिला रस्त्यावर फेकण्यात आले.
पीडित युवती रामपूर जिल्ह्याची रहिवासी आहे. तिचे वडील राजस्थानमधील एका मशिदीत इमाम आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपींनी युवतीची छेड काढली होती. याचा तिने विरोध केला होता. त्यानंतरही आरोपी तिची छेड काढीत होते. यामुळे या तरुणीने पोलिस तक्रार दिली. परंतु, तेथून परत येत असताना तिचे अपहरण करण्यात आले. तिला एका निर्जनस्थळी नेण्यात आले.
तिच्यावर आरोपींनी तब्बल तीन दिवस गॅंगरेप केला. त्यानंतर काल रात्री सुमारे नऊच्या सुमारास मुरादाबादच्या कटघर परिसरात कारमधून रस्त्यावर फेकण्यात आले. या आरोपींमध्ये तिची छेड काढणारे शाद आणि इरशाद हेही होते, असे तिने सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, काय म्हणाली पीडित युवती... बघा व्हिडिओ...