आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident Groom And 4 Family Member Dead In Kurukshetra

PHOTO: लग्नासाठी जात असलेल्या कारला अपघात, नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुरुक्षेत्र - पिहोवा-कुरूक्षेत्र मार्गावर रविवारी सकाळी 6.30 दरम्यान बस आणि वरातीच्या कारमध्ये झालेल्या धडकेत नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नवरदेवाची बहिण आणि सहा वर्षाची भाची यांचा समावेश आहे.

नवरदेव राजेंद्र हे कुरूक्षेत्र येथील रहिवासी असून त्याचा विवाह मानसा येथे होणार होता. रविवारी सकाळी 6:30 वाजता त्याची वरात विवाहस्थळी निघाली. वरात बसमध्ये तर नवरदेव राजेंद्र हा इतर सात जणांसोबत स्विफ्ट डिझायर कारमध्ये विवाहासाठी जात होते. त्यावेळी रस्त्यातील लोहार माजरा या गावाजवळ कारचालकाने ओवर टेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र धुके असल्याने पिहोवावरून दिल्लीला जाणारी रोडवेज बस चालकाला दिसली नाही आणि या दोघांची समोरासमोर धडक झाली.

या कारमध्ये प्रवास करत असलेल्या तीन जणांचा जागीच, तर इतर दोन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. मृतांची ओळख पटली असून यामध्ये नवरदेव राजेंद्र सिंह (वय 22), अरुणाय तेथील रहिवासी नवरदेवाची बहीण पुष्पा (वय 40), भाची काजल (वय 6), मानसा येथील रहिवाशी मामा रामनराता (वय 45) आणि शेजारी रणजीत सिंह (वय 40) अशी यांची नावे आहेत. तर नवरदेवाची भाची अर्चना आणि मामेबहिण पूजा यांची प्रकृती गंभीर आहे.

मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी दुःख व्यक्त केले.
रविवारी मुख्यमंत्री मनोहरलाल यांचा कुरूक्षेत्रचा दौरा होता. या अपघाताची माहिती मिळताच, मुख्यमंत्री, आमदार सुभाष सुधा आणि इतर नेत्यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तसेच ते अंत्यसंस्कारातही सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खाजगी कोट्यातून एक-एक लाख तसेच राजीव गांधी बीमा योजनेतून एक-एक लाख रुपये देण्याची घोषणा केली.
पुढील स्लाईडवर पाहा, घटनास्थळावरील काही निवडक फोटो...