आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामांकडून साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- अत्याचार प्रकरणातील आरोपी आसाराम यांच्यावर साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संबंधिताचा गेल्या काही दिवसांत मृत्यू झाला होता. मुलीच्या वडिलांनुसार, पोलिसांना १५ मिनिटांची ऑडिओ क्लिप पाठवण्यात आली आहे. यामध्ये जोधपूर बलात्कार खटल्यावरून आसाराम बापू आणि कृपाल सिंह(साक्षीदार) यांच्यात चर्चा झाली होती. कृपाल यांच्यावर शाहजहांपूरमध्ये १० जुलै रोजी हल्ला झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी बरेलीच्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता. आसाराम यांनी आठ महिन्यांपूर्वी साक्षीदाराशी संपर्क साधला होता, असा दावा करण्यात आला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार कृपाल यांनीच त्यांना ही ऑडिओ क्लिप दिली होती. कृपाल यांनी जोधपूर न्यायालयात दोन महिन्यांआधी आपला जबाब नोंदवला होता. आसाराम त्यांच्याशी बोलू इच्छित होते. संजयने आपल्या फोनवरून क्रमांक डायल केला आणि आसाराम यांना बोलायला लावले. यादरम्यान कृपाल यांनी आपल्या फोनमध्ये साउंड रेकॉर्डिंग ऑन केले होते. संजय आणि राघव कृपाल यांच्या मृत्यू प्रकरणात संशयित आहेत.
ऑडिओ टेपवरून तपास शक्य
शाहजहांपूरचे पोलिस अधीक्षक बबलू कुमार यांनी ऑडिओ क्लिपला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, या प्रकरणी अत्याचार पीडिताकडून दिलेली ऑडिओ क्लिप तपास अधिकाऱ्याकडे सोपविली आहे. क्लिपमध्ये सत्यता आढळल्यास ती तपासाचा भाग बनविली जाईल.
बातम्या आणखी आहेत...