आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azam Khan Calls Rahul An 'innocent Child' Who Reads Whatever Given To Him

राहुल गांधी निरागस बालक, आझम खान यांनी खरमरीत टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी निरागस बालस असून लिहून दिलेले भाषण जनसभेत वाचतात, अशी खरमरीत टीका समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी आज (शनिवार) केली.

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या दंगलीवरून समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मतांचा राजकारणासाठी काही राजकीय पक्ष दंगली घडवून आणतात, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्यावर खळबळ उडाली होती. त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांची आजी आणि पणजोबा अशा दंगली घडवित होते, असे समाजवादी पक्षाने सांगितले होते.

उत्तर प्रदेशातील बदायूँ येथील सभेला संबोधित करताना आझमखान म्हणाले, की राहुल गांधी निरागस बालक आहे. त्यांना जसे सांगितले जाते तसे ते वागतात. एका सभेत त्यांनी सॉ मिलचा उल्लेख प्लायवूड कारखाना असा केला होता. ते लिहून दिलेली भाषणे वाचतात. कॉंग्रेसने या देशावर 50 वर्षांपेक्षा जास्त वर्ष सत्ता केली आहे. या काळात अनेक दंगली घडून आल्या आहेत. त्याची सर्वस्वी जबाबदारी कॉंग्रेसची आहे.