आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी फोनवर किंचाळत होती, नंतर आला हत्या झाल्याचा दुसरा फोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद (उत्तर प्रदेश)- आई मला वाचव. हा सनी मला ठार मारेल. तो म्हणतोय, की तुला मारुन जमिनीत गाडेल, असे म्हणत मुलीचा फोन बंद झाला. आई काहीही करु शकली नाही. त्यानंतर जरा वेळात मुलीचा मृत्यू झाला असल्याची माहिती आईला मिळाली. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तरुणाने गर्लफ्रेंडची गळा दाबून हत्या केली.
वाचा काय आहे प्रकरण
- शेफाली गौड (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती सनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
- तिचे वडील श्यामलाल गौड पानटपरी चालवतात. तर आई निलम गौड लोकांच्या घरी स्वयंपाक करते.
- या कमाईतून शेफालीसह पाच मुलांचा दोघे सांभाळ करतात.
- घटनेच्या दिवशी दुपारी शेफालीचा आईला फोन आला. त्याने भेटायला बोलवले आहे, असे तिने सांगितले.
सनीच्या घरुन आला अखेरचा कॉल
- जरा वेळात तिचा पुन्हा फोन आला. यावेळी ती प्रचंड घाबरलेली होती. हमसून हमसून रडत होती.
- ती म्हणाली, आई मला वाचव. हा सनी मला ठार मारेल. तो म्हणतोय, की तुला मारुन जमिनीत गाडेल.
- त्यानंतर सहा वाजता सनीला निलम यांना फोन आला. तुमच्या मुलीची प्रकृती खराब झाली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय, असे त्याने सांगितले.
- काही वेळात आईवडील हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना समजले, की तिचा मृत्यू झाला आहे. पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये मृतदेह ठेवला आहे.
- पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सनीला अटक केली.
गळा दाबून केली हत्या
- शेफालीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तिच्या गळ्यावर वळ उमटले आहेत.
- तिच्या एका हातावर कापल्याचा खुणा आहेत.
- सनीनेच गळा दाबला असावा असा पोलिसांना संशय आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...