आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू भावाने मानलेल्‍या मुस्लिम बहिणीला दिली किडनी, सोहनवीर- वकीलाचे अनोखे नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली येथील जामा मशिदमध्‍ये शनिवारी नमाज पठण करताना मुस्‍लिमबांधव. - Divya Marathi
नवी दिल्‍ली येथील जामा मशिदमध्‍ये शनिवारी नमाज पठण करताना मुस्‍लिमबांधव.
मेरठ - देशात रमजान ईदचा उत्‍सव दिसत आहे. ईदनिमित्‍त देशबांधव एकमेकांना शुभेच्‍छा देत आहेत. यादरम्‍यान उत्‍तर प्रदेशातील एका हिंदू भावाने आपल्‍या मानलेल्‍या मुस्लिम बहिणीला किडनी देऊन तिला नवीन आयुष्य भेट दिले आहे.
बागपतमधील दोघट येथील र‍हिवासी शकील यांचा दूधाचा व्‍यवसाय असून पानीपत येथील सोहनवीर हा त्यांच्याकडे नोकरी करतो. सोहनवीरने याच परिसरात राहात असलेल्या वकीला हिला बहीण मानले होते. दरम्‍यान, वकीलाची किडनी निकामी झाली होती. तिच्याकडे किडनी प्रत्‍यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नव्‍हता. वकीलाला दरवर्षी ईदनिमित्‍त भेटवस्‍तू देणार्‍या सोहनवीरने यंदा वकीला चक्क आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. वकीलाने यास नकार दिला. परंतु, त्याआधीच सोहनवीरने तिच्‍याकडून भेट नाकारायची नाही, असे वचन घेतले होते.
किडनी दानासाठी मिळाली मंजूरी
सोहनवीरने किडनी दान करण्‍यासाठी अर्ज केला. तो मान्‍यही झाला. बागपत येथील सीएमओ डॉ. रवींद्र कुमार यांनी सांगितले की, 'सोहनवीरचा अर्ज मंजूर करण्‍यात आला आहे. एका आठवड्यात वकीलाला प्रत्‍यारोपणातून किडनी देण्‍यात येईल.'
काय म्‍हणतो सोहनवीर
किडनी निकामी असल्‍यामुळे वकीलाला प्रचंड त्रास होत होता. बहिणीचा त्रास मला पाहवत नव्‍हता. त्‍यामुळे ईदनिमित्‍त मी तिला चांगले आयुष्‍य भेट देण्‍याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रीया सोहनवीरने दिली आहे.