आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावतींच्‍या पाया पडतानाचा फोटो FB वर, BSP ने कापले या महिलेचे तिकीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीता चौधरी आणि मायावती यांचा फोटो. - Divya Marathi
संगीता चौधरी आणि मायावती यांचा फोटो.
लखनौ - बहुजन समाज पार्टी (बसप) अध्‍यक्षा मायावती यांच्‍या पायांना स्‍पर्श करतानाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. संगीता चौधरी असे या महिलेचे नाव असून, पक्षाने महिलेचे अतरौली विधानसभेच्‍या सीटसाठीचे तिकीट कापले आहे. उत्‍तर प्रदेशमध्‍ये पुढील वर्षात निवडणूका होणार आहेत.
तिकीट कापल्‍यानंतर उमेदवार महिलेने काय म्‍हटले....
- संगीता म्‍हणाल्‍या - मीडियाव्‍दारे मला तिकीट कापण्‍यात आल्‍याचे लक्षात आले.
- '' या प्रकरणानंतर स्‍पष्‍टीकरण देण्‍याची संधीही मला मिळाली नाही.''
- ''मी बहणजींना भेटून स्‍पष्‍टीकरण देणार आहे. सध्‍या यासंदर्भात पक्षाच्‍या नेत्‍यांशी चर्चा झाली नाही.''
- ''मला तिकीट मिळाले होते तेव्‍हा, मी हा फोटो फेसबुकवर अपलोड केला होता. मात्र, राजकीय वैरभावनेतून या फोटोवरून वाद निर्माण करण्‍यात येत आहे.''
कोण आहे संगीता?
- संगीता अलीगड, अतरौलीमधून बसपाच्‍या उमेदवार होत्‍या. आधी त्‍यांचे पती धर्मेंद्र चौधरी यांना उमेदवारी देण्‍यात आली होती.
- धर्मेंद्र यांची गोळी झाडून हत्‍या करण्‍यात आली.
- त्‍यानंतर पक्षाने 12 जुलै, 2015 ला संगीता यांना उमेदवारी देण्‍याचा निर्णय घेतला होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...