आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखवर गुन्हा दाखल, शिया समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच सीनमुळे विरोध होत आहे. यामध्ये शाहरुख अलमच्या  जुलूसवरुन हवेतून उडी मारताना दिसत आहे. - Divya Marathi
याच सीनमुळे विरोध होत आहे. यामध्ये शाहरुख अलमच्या जुलूसवरुन हवेतून उडी मारताना दिसत आहे.
जौनपुर - शाहरुख खानसमवेत 6 लोकांवर चित्रपट 'रईस'मध्ये शिया समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावला आहे. यावर जौनपुरच्या सिव्हिल कोर्टमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टाने केस करणा-याला 19 डिसेंबरला पुरुवा सादर करण्याचे सांगितले आहे. या लोकांवर लावले आरोप...
- जौनपुरचे वकील सय्यद शहंशाह हुसैनने रईस चित्रपटाचे डायरेक्टर राहुल ढोलकिया, शाहरुख खान, प्रोड्यूसर गौरी खान, फरहान अख्तर, रितेश सिधवानी आणि सेंसर बोर्डचे चेयरमन पहलाज निहलानी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

- हुसैनने आपल्या तक्रारीत सांगितले आहे की, त्यांनी 8 डिसेंबरला वर्तमान पत्रात वाचले आणि सोशल मिडियावर पाहिले की रईसमध्ये शाहरुखला शिया समुदायाच्या अलम-ए-मुबारक जुलूसच्या वरुन उडी मारताना दाखवले आहे.

- यामुळे शिया समुदायाच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यासोबतच देशाची एकता आणि अंखडतेवर परिणाम झाला आहे.

- हुसैन यांच्यानुसार हा सीन शिया कम्युनिटीच्या पवित्र अलम-ए-मुबारकच्या तौहीन कॅटेगिरीमध्ये येतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा फोटोज, आणि गुन्ह्याची कॉपी...
बातम्या आणखी आहेत...