आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लिव्ह इन\' मध्ये राहणार 89 वर्षीय एन. डी. तिवारी, घरासमोर घडले नवे नाट्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण दत्त तिवारी यांचा कौटुंबीक वाद पुन्हा उफाळला आहे. शुक्रवारी त्यांचा मुलगा रोहित शर्माची आई उज्ज्वला शर्मा समर्थकांसह तिवारी यांच्या लखनऊ येथील घरी पोहचली. सुरक्षारक्षकांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केल्याने, त्यांनी समर्थकांसह दरवाजासमोरच आंदोलन केले. त्यानंतरही दार उघडले नसल्याने, लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तर एन.डी.तिवारी, भवानी भट्ट आणि उज्ज्वला शर्मा यांच्यात चर्चा होऊन तोडगा निघाला. यावेळी उज्ज्वला यांनी एन.डी.तिवारी यांच्यासमोर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये सोबत राहण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
तिवारी यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) भवानी भट्ट यांनी तत्काळ या प्रकाराची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस तिवारींच्या घरी पोहचले व ते लोकांना घराबाहेर काढू लागले. यावेळीही तणाव निर्माण झाला होता. पण चर्चेनंतर पुन्हा वातावरण शांत झाले.
यावेळी तिवारी यांचा मुलगा रोहित याचा वाद नसून ओएसडी भवानी भट्ट आणि उज्ज्वला शर्मा यांच्यामध्ये आहे. भवानी भट्ट आणि तिवारी यांचा पुतण्या मनीष तिवारी हे उज्ज्वला आणि तिवारी यांच्यातील संबंधांमध्ये दुरावा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तिवारी यांना घरात बंदी बनवले असून, आपल्याला घरात प्रवेश दिला जात नसल्याच आरोपही उज्ज्वला यांनी केला आहे.
भवानी यांचा राजीनामा
या संपूर्ण नाट्यानंतर या प्रकरणाने एक नवे वळण घेतले. अनेक वर्षांपासून तिवारी यांचे विश्वासू ओएसडी असणा-या भवानी भट्ट यांनी ओएसडीपदाचा राजीनामा दिला. तिवरी यांच्याविरोधात कट-कारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे. त्यामुळेच उज्ज्वला शर्मा त्यांच्या सरकारी घरामध्ये प्रवेश करण्यासाठी रोज नव्या पद्धती अवलंबत असल्याचेही भट्ट म्हणाले.
जीवे मारण्याची धमकी
भवानी यांनी उज्ज्वला शर्मा यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. उज्ज्वला यांनी तिवारी यांच्यासमोर लिव्ह इन रिलेशनशीपचा प्रस्ताव ठेवला आहे. पण त्या जर या घरात राहिल्या तर, आपल्यावर नको ते आरोप केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये तिवारी यांची देखभाल करण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगत भवानी यांनी सरकारला राजीनामा पाठवला आहे.
तिवारी यांनी अनेक वर्षांच्या वादानंतर रोहित आपलाच मुलगा असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर रोहितची आईची आपला हक्क मिळवण्यासाठी सक्रिय झाली आहे.
उज्ज्वला यांचे तिवारींच्या घरासमोर आंदोलन...पुढील स्लाईडमध्ये...