आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहालची क्रेझ: शहाजहानने त्यागले होते चैनी आयुष्य, कामगारांना दिला पाचपट जादा पगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या ताजमहाल निर्मितीची कथाही आश्चर्य कारक आहे. मुमताजसाठी ताजमहाल तयार करणारा राजा शाहजान आणि निर्मितीचे कार्य करणारे तज्ज्ञ यांच्‍या इच्‍छाशक्तिला दाद द्यावी लागेल. कारण ताजमहाल तयार करण्‍यासाठी शहाजहानने आपले सर्व छंद आणि चैनी आयुष्‍य बाजूला ठेवून ताजमहाल तयार करणाचे एकमेव वृत हाती घेतले होते.
तजमहाल तयार करण्‍यासाठी त्‍याकाळातील अभियंते आणि 22 हजार कामगारांच्‍या मदतीने 22 वर्षात ताजमहल तयार करणे हे शहाजहानसमोर एक आव्‍हान होते, असे मत आयआयटीचे रूडकीचे प्रोफेसर डॉ. एस.सी. हांडा यांनी व्‍यक्‍त केले. ताजमहाल तयार करण्‍यासाठी पार्शियामधून बोलवण्‍यात आलेल्‍या तज्ज्ञांना 361 वर्षांपूर्वी 1500 रूपये महिना देऊन तहाजमहालेचे काम पूर्ण करून घेतले. या तज्ज्ञांबरोबरच कामगारांनाही पाच पट रोजगार देण्‍यात आला असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. 'ताजमहालची निर्माती आणि इतिहास' या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढील स्‍लाईडवर वाचा का दिला कामगारांना पाच पट रोजगार...