कानाने ऐकू येत नसल्यामुळे कुंटुंबातील व्यक्तिंकडून होत असलेल्या छळाला कंटाळून दिल्लीच्या मम्मन चंद नेवी नावाच्या वृद्धाने विष घेऊन आत्महत्या केली. उपचारादरम्यान मंडलीया रूग्णालयात या वृद्धाचा मृत्यू झाला. आत्महत्या केलेल्या नेव्ही रिटायर वृद्धाकडे पोलिसांच्या नावे एक सुसाईड नोट मिळाली. यामध्ये अंतिमसंस्कार करण्याची विनंती पोलिसांना या वृद्धाने केली आहे. मोक्ष प्राप्त होण्यासाठी 13 हजार रूपये खर्च करून माझा अंतिमसंस्कार करा अशा प्रकारची वनिंती सुसाईडनोटमध्ये यावृद्धाने केली आहे.
गंगा आरती सुरू असताना केले विष प्राशन-
गंगा आरती सुरू झाल्यानंतर या वृद्धाने विष प्राशन केल असल्याचा आंदाज पोलिसांनी व्यक्ति केला आहे. विष प्राशन केल्यानंतर वृद्ध चालत पोलिस चौकीजवळ येऊन पडला. पोलिसांनी काय प्रकार आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी वृद्धाला रूग्णालयात दाखल केले. मात्र रूग्णालयात या वृद्धाने प्राण सोडले.
अंत्यविधीसाठी लागणा-या खर्चाची माहिती-
आत्महत्या केलेल्या वृद्धाच्या बॉगमध्ये अंत्यविधीसाठी लागणारे 13 हजार रूपये बॉगमध्ये ठेवण्यात आले होते. याशिवाय एक मोबाईल आणि एक घड्याळ बॅगमध्ये सापडली. या 13 हजार रूपयांमध्ये अंत्यविधी करण्याची विनंती पोलिसांना सुसाईड नोटमध्ये करण्यता आली होती.
पुढील स्लाईडवर पाहा सुसाईड नोटची आणखी काही छायाचित्रे...