आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drone Found Maneater Tigress Bijnor, Divya Marathi

यूपीमध्ये नरभक्षी वाघिणीचा धुमाकूळ; 10 जण ठार, ड्रोनच्‍या मदतीने शोधमोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनोर- उत्तर प्रदेशातील बिजनोर भागात एक महिन्यापासून नरभक्षी वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. मानवी रक्ताला चटावलेल्या वाघिणीने आतापर्यंत 10 जणांना ठार केले.बिजनोर परिसरातील नागरिकांना वाघिणीच्या दहशतीखाली रोजचा दिवस काढावा लागत आहे. प्रशासनाकडून तिला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्यापपर्यंत ही वाघीण वन खात्याच्या जाळ्यात सापडलेली नाही.अधिकारी रात्रंदिवस वाघिणीचा शोध घेत असून महिनाभरापासून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी बिजनोरचे बसपा आमदार मोहंमद गाझी यांनीदेखील शोधमोहिमेत सहभाग घेऊन वनाधिकाºयांना सूचना दिल्या. मतदारसंघातील नागरिकांच्या प्राणाचे रक्षण करण्याची माझी नैतिक जबाबदारी असल्याचे गाझी यांनी सांगितले. त्यांच्या कृतीवर राजकीय क्षेत्रातून टीका होत आहे. गाझी राजकीय स्टंट करत असल्याची टीका झाली आहे. दरम्यान, कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून पळून गेल्यानंतर वाघिणीने अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. जानेवारीपासून वाघिणीने परिसरात दहशत निर्माण केली आहे.
ड्रोन’ची मदत
एक महिन्यापासून वनाधिका-यांना चकवा देणा-या वाघिणीला पकडण्यासाठी प्रशासनाने अनमँड एरियल व्हेइकल्स (यूएव्ही) या ड्रोनची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शुक्रवारी यूएव्हीला हवेत सोडण्यात आले. यूएव्हीचा आकार छोट्या विमानासारखा आहे. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हे ड्रोन नियंत्रित केले जाऊ शकतात. अलाहाबादमधील तज्ज्ञांच्या पथकाने शोधमोहिमेचे नेतृत्व हाती घेतले आहे. ते वनाधिकाºयांना मदत करत आहेत. ड्रोनच्या मदतीने वाघिणीचा ठावठिकाणा लागेल, असा विश्वास अधिका-यांनी व्यक्त केला.