आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठीत एका घरात आढळले 11 मृतदेह, मृतांमध्‍ये 6 मुले, हत्‍येची शंका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर घराबाहेर झालेली गर्दी. - Divya Marathi
घटनेनंतर घराबाहेर झालेली गर्दी.
अमेठी - उत्‍तर प्रदेशातील अमेठीमध्‍ये एका घरात अकरा जणांचे मृतदेह आढळुन आल्‍याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्‍ये 6 मुलांचा समावेश आहे. सर्व मृत व्‍यक्ति एकाच कुटुंबाचे आहेत. कुटुंबप्रमुखाचा मृतदेह घरात फाशीच्‍या स्थितीत लटकलेला आढळूून आला. गावकऱ्यांनी संशय व्‍यक्‍त केला आहे की, कुंटुब प्रमुखाने प्रथम सर्वांची हत्‍या केली, नंतर स्‍वत: फाशी घेतली. घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
फक्‍त पत्‍नी बचावली आहे.
 
- घटना अमेठीतील महोना गावामध्‍ये घडली आहे. गाव बाजार शुक्‍ल पोलिस स्‍थानकाच्‍या अंतर्गत येते. 
- सर्वांची धारदार शस्‍त्राने हत्‍या केली आहे. 
- कुटुंब प्रमुख जमालुद्दीन (45) याचा मृतदेह घरात फाशीच्‍या स्थितीत लटकलेला आढळून आला.  
-  घटनेमध्‍ये फक्‍त जमालुद्दीनची पत्‍नी बचावली आहे. ती बेशुध्‍द अवस्‍थेत होती. सीएचसी जगदीशपूर या रुग्‍णालयात तिला दाखल केले असून ती अजूनही बेशुध्‍द अवस्‍थेतच आहे. 
- कुटुंबप्रमुखाची पत्‍नी शुध्‍दीवर आल्‍यावर, घटनेचे कारण समजू शकेल. 
 
घटनास्‍थळी आयजी- डीआयजी 
- घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. 
- पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहे. आयजी आणि डीआयजी यांनी घटनास्‍थळी येऊन तपासणी केली.
 
काय म्‍हणतात गावकरी
- गावकऱ्यांनी संशय व्‍यक्‍त केला आहे की, कुटुंबप्रमुखाने सर्वांना बेशुध्‍दीच औषध देऊन नंतर त्‍यांची धारदार शस्‍त्राने हत्‍या केली. यानंतर स्‍वत: फाशी घेतली.      
 
पुढील स्‍लाईडवर पहा, घटनेसंबधित फोटोज
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...