आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire Broke Out In A Bus In Amethi In Uttar Pradesh

अमेठीत बसला लागलेल्या भीषण आगीत 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 16 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी (उत्तर प्रदेश)- फैजाबाद येथून अलाहाबाद येथे जात असलेल्या बसला रामगंज पोलिस स्टेशन परिसरात आज सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 16 गंभीर जखमी झाले. फायर ब्रिगेडला तब्बल दोन तासांनी या घटनेची माहिती मिळाली. तोपर्यंत स्थानिक लोकांनी बसला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दुःख व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासह जखमी प्रवाशांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
स्थानिकांनी सांगितले आहे, की पीपरपूर पोलिस ठाण्याच्या सन्सारीपूर गावाजवळून जात असताना बसचा वरचा भाग रस्त्यावर असलेल्या विजेच्या तारांना घासून गेला. यामुळे बसला आग लागली असावी. प्रारंभी आग अगदी किरकोळ होती. त्यानंतर तिने रौद्ररुप धारण केले. यावेळी काही लोकांनी अगदी खिडक्यांमधून बाहेर उड्या मारुन जीव वाचवला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अमेठीत बसला लागलेली भीषण आग...