आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Commit Suicide Beaten And Insulted Kanpur News

होमवर्क न केल्याने शिक्षिकेने विद्यार्थीनीला केले विवस्त्र, पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर (उत्तर प्रदेश)- होमवर्क न केल्याने शिक्षिकेने आठवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीला जबर मारहाण केली. वर्गात तिचा जाहीर अपमान केला. यानंतरही समाधान न झाल्याने तिला विवस्त्र केले. यामुळे प्रचंड मानसिक आघात बसल्याने विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दित ही घटना घडली आहे. संबंधित विद्यार्थीनी पूर्णादेवी गर्ल्स इंटर शाळेत आठव्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी ती शाळेत गेली. यावेळी शिक्षिकेने होमवर्क तपासले. विद्यार्थीनीने होमवर्क केले नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने प्रथम स्केलने मारहाण केली. संपूर्ण वर्गासमोर अपमानित केले. तिला विवस्त्र केले.
हा अपमान सहन न झाल्याने विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, दोषी शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थीनीच्या पालकांनी केली आहे.