लखनौ- एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे शीर कापून आणणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. तसेच शीर कापून आणेल त्याची केसही हिंदू महासभा लढणार आहे. महासभेचे कार्यकारी अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी म्हटले आहे, की ओवेसे हिंदू नेत्यांना वारंवार आव्हान देत आहेत. आता धर्मयुद्ध होईल. मला जर संधी मिळाली तर मी स्वतः ओवेसी यांचे शीर कापून आणेल.
कमलेश तिवारी यांनी सांगितले, की असदुद्दीन ओवेसी यांचे शीर जो कुणी कापून आणेल त्याची केस हिंदू महासभा कनिष्ठ ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढेल. यासाठी नामांकीत वकील निवडले जातील. दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीला ओवेसी यांनी सर्वांत आधी विरोध केला होता. त्यानंतर इतर लोकांनी पत्रे लिहिण्यास सुरवात केली. ओवेसींना मदत करणारे लोकही देशद्रोही आहेत. ओवेसी यांचे शीर कापण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
सर्वांना तुरुंगात टाका
याकूब मेमनला शिक्षा मिळण्यापूर्वी असे म्हटले जायचे, की दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो. आता या प्रकरणी धर्माचा उल्लेख कसा काय आला? मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकायला हवे. या लोकांविरुद्ध आम्ही आंदोलन छेडणार आहोत.
कार्यकर्त्यांना पाठविणार पत्र, सोशल मीडियाची घेणार मदत
हिंदू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा केल्यानंतर ओवेसींचे शीर कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात महासभेचे कार्यकर्ते आणि हिंदू संघटनांना पत्रे लिहिली जाणार आहेत. या शिवाय 100 लोकांची आयटी टीम तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक अभियान चालवून ही बाब देशातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविली जाईल. ओवेसीचे शीर कापले तर हिंदू विरोधी लोकांना चांगलाच धडा बसेल, असेही तिवारी यांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा, हिंदू महासभेने ओवेसी यांचे शीर कापण्यासंदर्भात जाहीर केलेले पत्र...