आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Temple Remnants Had Found At Babri Masjid Site, Says KK Muhammad

बाबरी मशिदीच्या जागी सापडले होते मंदिराचे अवशेष- ASI चे संचालक महंमद यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 1976-77 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाकडून (एएसआय) करण्यात आलेल्या उत्खननात हिंदू मंदिराचे अवशेष सापडले होते, असा दावा एएसआयचे प्रादेशिक संचालक (उत्तर विभाग) के. के. महंमद यांनी केला आहे. एएसआयचे तत्कालिन प्रधान संचालक आणि प्राध्यापक बी. बी. लाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्खनन करण्यात आले होते असेही महंमद यांनी सांगितले आहे.
फस्टपोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, के. के. महंमद यांनी 'नज्न ए भारतीय' या स्मरणीकेत ही माहिती दिलेली आहे. इरफान हबिब आणि रोमिला थापर या डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी मुस्लिम आणि हिंदू समाजात एकमत होण्याच्या प्रयत्नांना खिळ घातल्याचा आरोपही महंमद यांनी केला आहे.
महंमद यांनी सांगितले, की डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांच्या विचारसरणीला मुस्लिम समाजातील नागरिक बळी पडले नसते तर बाबरी मशिद विवाद कधीच निकालात निघाला असता. रोमिला थापर, बिपिन चंद्रा आणि एस गोपाल यांच्यासह काही इतिहासकारांनी सांगितले आहे, की अयोध्येत 19 शतकापूर्वीचे हिंदू मंदिर नव्हते. उलट येथे बुद्धिस्ट-जैन केंद्र होते. इरफान हबिब, आर. एस. शर्मा, डी. एन. झा, सुरज बेन आणि अख्तर अली या इतिहासकारांनी या संकल्पनेला पाठिंबा दिला होता. पण पुरातत्व विभागाने खोदकाम केले तेव्हा मशिदीच्या खाली हिंदू मंदिराचे अवशेष आढळून आले होते.
महंमद यांनी सांगितले आहे, की बाबरी मशिदीच्या जागी आम्हाला हिंदू मंदिराचे एकूण 14 खांब सापडले होते. त्यांच्यावर मंदिराच्या कळसासारखा भाग होता. 11 व्या आणि 12 व्या शतकातील मंदिरांवर आढळून येतो तसा कळस येथे सापडला होता. तेव्हा असलेल्या समृद्धीचे रेखाटण या कळसावर करण्यात आले होते. त्यामुळे मंदिराच्या अवशेषांवर ही मशिद बांधण्यात आली होती हे सिद्ध होते. याबाबत मी अनेक इंग्रजी वृत्तपत्रांना माहिती दिली. पण केवळ एका वृत्तपत्राने संपादकीय भागात मला लिहिण्याची संधी दिली होती.
पुढील स्लाईडवर वाचा, कुतुब मिनार, ताज महालाच्या जागी होती हिंदू मंदिरे.... महंमद यांच्या दाव्याला काहींचा पाठिंबा तर काहींचा विरोध....