आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड, विरोध करणाऱ्या वडिलांना गुंडांनी जाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर / उन्नाव- उत्तर प्रदेशमध्ये मुलीच्या छेडछाडीचा विरोध करणाऱ्या पित्याला जिवंत जाळल्याचे प्रकरण समोर आले आहे. गंभीर भाजलेल्या रामसेवकला रविवारी उन्नावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कानपूरला हलवण्यात आले. मंगळवारी त्यांचे निधन झाले. उन्नावच्या कैथनखेडा गावातील ही घटना आहे.

मृत रामसेवक यांची पत्नी आशा देवी यांच्या म्हणण्यानुसार, गावातील कालीचरण, पप्पू आणि फत्तू गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मुलीची छेड काढत होते. विरोध केल्यानंतर त्यांच्यावर शेतात घुसल्याचा आरोप करत सतत मारहाण करण्यात आली होती.

रविवारी सकाळी त्यांचे पती रामसेवक शेतात जात असताना तीन आरोपींनी बेदम मारहाण केली व पेटवून दिले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी योग्य वेळी मदत दिली असती तर आपल्या पतीचे प्राण वाचले असते. पोलिसांनी तीन गुंडांविरुद्ध कारवाई न केल्यास आपण मुलीसह आत्महत्या करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...