आग्रा - जगातील आठ आश्चर्यापैकी आग्रा येथील 'ताजमहल' त्यापैकी एक. ताजमहल इतकेच महत्त्व या वास्तुसमोर असलेल्या एका छोट्या बेंचला आहे. या बेंच जगभरात 'डायना बेंच' या नावाने ओळखला जातो. देश- विदेशातील हजारो पर्यटक दररोज ताजमहल पाहाण्यासाठी येतात. सामान्य पर्यटक असो अथवा सेलिब्रिटींना या बेंचवर बसूण फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. ताजमहलसमोरील या बेंचची निर्मिती कोणी केली असेल बरं? असा प्रश्न आपल्यालाही पडलाय ना!
'ताजमहल' समोरिल हा बेंच' एका ब्रिटीश व्हॉइसरॉय यांनी तयार केला होता. या बेंचवर बसून ताजमहलाचे सौंदर्य डोळे भरून पाहाता यावे, हा त्यामागचा उद्देश होता. आज जगभरातील प्रत्येक पर्यटक या बेंच'वर बसून फोटो काढण्यासाठी उत्सूक असतो, असे इतिहास तज्ज्ञ राजकिशोर सांगतात.
ब्रिटीश व्हॉइसरॉय लॉर्ड कर्जन हे ताजमहल पाहण्यासाठी आले तेव्हा, ताजमहल परीसरात उंच झाडे होती, या झाडांमुळे ताजमहल पाहण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी व्हॉइसरॉयने ताजमहलासमोर 'बेंच' बसवण्याचा निर्णय घेतला. ताजमहल परिसरातील झाडे तोडून या ठिकाणी मोठे गार्डन तयार करण्याचा आदेश व्हॉइसरॉयने दिले.
पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या 'गोल्डन फाईल'विषयी ......