आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPS Officer Aparna Kumar Scales The Tallest Peak In Antarctica

अपर्णा कुमार ठरली अंटार्क्टिकातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली IPS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- उत्तर प्रदेश कॅडरची आयपीएस अधिकारी अपर्णा कुमार हिने अंटार्क्टिकातील सर्वांत उंच शिखर माऊंट विन्सन मॅसिफ सर करुन विक्रम केला आहे. या शिखरावर तिरंगा फडकावणारी ती पहिली प्रशासकीय अधिकारी ठरली आहे.
अपर्णा कुमारने 17 जानेवारी रोजी हा विक्रम आपल्या नावावर केला. 5 जानेवारी रोजी वेगवेगळ्या देशातील 10 सदस्याच्या टीमसोबत ही मोहिम सुरु करण्यात आली होती. त्यात तिचा समावेश होता. आता जगभरातील 7 आव्हानात्मक शिखरांपैकी 5 शिखरांना पादाक्रांत करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मोहिमेतही ती सहभागी होणार आहे. माऊंट एव्हरेस्ट (एप्रिल-मे) आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले (जुलै-ऑगस्ट) या शिखरांचाही समावेश यात आहे.
अपर्णा सध्या हलक्या स्वरुपाच्या फ्रोस्ट बाईटने आजारी आहे. 15 दिवसांच्या उपचारानंतर ती बरी होणार आहे. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी ती भारतात परत येईल.
लखनौच्या पोलिस डेलिकॉम विभागात अर्चना डीआयजी आहे. 2002 च्या बॅचची ती आयपीएस अधिकारी आहे.
गिर्यारोहणात अनेक विक्रम आपल्या नावावर केल्याने मार्च 2015 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने 'राणी लक्ष्मीबाई पुरस्कार' देऊन अपर्णाला गौरविले होते. प्रजासत्ताक दिनाला तिला स्पेशल डीजीपी रिकमेंडेशन डिस्कही प्रदान करण्यात आली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या बर्फाळ शिखरावर अर्पणाने फडकावला तिरंगा... उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी असे केले कौतुक....