भारतीयांचे विविध प्रकारे शोषण करणा-या इंग्रजाना देशाबाहेर काढण्यासाठी विविध पातळीवर संघर्ष सुरू होता. कुणी हिसेंच्या मार्गाने तर कोणी अहिंसेच्या मार्गांने 'इस्ट इंडिया कंपनी'ला विरोध करत होते. इंग्रजाना देशाबाहेर घालवण्यासाठी चंद्रशखेर आजाद आणि त्यांच्या सहका-यांनी काकोरीजवळ रेल्वे लुटली. 9 ऑगस्ट 1925 काकोरी कट म्हणून ओळखले जाते.
काकोरी कटामध्ये सहभागी झालेल्या सर्वच क्रांतिकारकांना पकडण्यात आले. यापैकी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, अशफाक उल्लाह खॉं आणि राजेंद्र प्रसाद लाहिडी यांना 19 डिसेंबर 1927 मध्ये फासी देण्यात आली.
हे क्रांतिकारक शहिद झाल्यांनतर काकोरी येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले. देशाला स्वतंत्र्य मिळवून देणा-या क्रांतिकारकाचे स्मरण म्हणून प्रत्येक वर्षी 19 डिसेंबरला काकोरी येथे शहिद दिन साजरा केला जातो.
क्रांतिकारकांचा विक्रम-
काकोरीतील शहिद स्मारकाचे पूजारी राजकूमार मिश्रा सांगतात काकोरीमध्ये ट्रेन लुटल्यांनतर क्रांतिकारकांनी इंग्रजांची 'तिजोरीची पेटी' 200 मिटर रेल्वे ट्रकपासून दूर नेऊन तोडली होत. तिजोरी तोडण्यात आलेल्या जागेला ' ककराहा बाबा स्थळ' म्हणून ओळखले जाते. काकोरी कटाची जबाबदारी 20 क्रांतिकारकांनी स्विकारली होती. काकोरी कटाचे मुख्य सुत्रधार म्हणून चंद्रशेखर आझादला ओळखले जाते.
पुढील स्लाईडवर पाहा या स्मारकाची फोटो...