आग्रामध्ये आयटीसी कंपनीचा मोघल कालीन परंपरा असेलेला काया कल्प 'स्पा' प्रसंन्न करणारा आहे. या परिसराला स्पा नावाने ओळखले जाते. सर्व बाजूने हिरवळ पसरलेली असल्यामुळे येणा-या प्रत्येक पर्यटकाला प्रसंन्न वाटते. 99 हजार वर्गफीटच्या परिसरामध्ये परसरलेल्या या स्पाला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक आग्र्याकडे येत आहेत.
प्रत्येकाला सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. आगदी राज महालासारखी सेवा याठिकाणी दिली जाते. तुम्हाला आरोग्या संदर्भातील भारतीय पद्धतीच्या रिलेक्सिंग मसाज, डी स्ट्रेसिंग थेरेपी, हॉट स्टोन मसाज केली जाते.
या 'स्पा'ला पारंपरीक तुर्कीश बाथ्स यापैकी एक गणले जाते. यामध्ये सलून, स्पा टब आणि आराम करण्यासाठीची सुविधा देण्यात आलेली आहे. खाद्यपदार्थामध्ये भारतीय पद्धतीच्या सर्व डिश उपलब्ध आहेत.शिवाय आतंरराष्ट्रीय डीश, इराणी डीश पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.