आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Yadav Brother Daughter Will Marry In Mulayam Family

मुलीनंतर आता लालूंची भाची होणार मुलायम कुटुंबाची सून, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ (उत्तर प्रदेश)- मुलगी राजलक्ष्मी हिच्यानंतर लालू प्रसाद यादव यांची भाची ईशा ही मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील सून होणार आहे. लालूंचा मेव्हुणा साधू यादव यांनी मुलगी ईशा हिचे लग्न मुलायमसिंह यांची नात राहुल यादव यांच्यासोबत पक्के केले आहे. 26 फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा आटोपला. आज दोघांचा तिलकोत्सव इटावा क्लबमध्ये होणार आहे.
असे फिक्स झाले लग्न
- राहुल आणि ईशा यांची मैत्री नोएडा येथील एमिटी विद्यापिठात झाली होती. दोघेही तेथेच शिकायला होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांनी मान्यता दिली आहे.
- राहुल सध्या कौटुंबीक व्यवसाय करतो.
इटावा क्लबमध्ये आज तिलकोत्सव
- तिलकोत्सव आणि लगन आज इटावा क्लबमध्ये होणार आहे. याची तयारी करण्यात आली आहे.
- मुलायमसिंह यादव, रामगोपाल यादव, शिवपाल यादव, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह संपूर्ण कुटुंब या लग्नाला उपस्थित राहणार आहे.
- लालू प्रसाद यादव, साधू यादव यांच्यासह अनेक यादव कुटुंबीयही या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
असे आहे राहुलचे कुटुंब, मुलायम यांच्याशी निगडीत
- राहुल यादवच्या आईचे नाव शीला यादव आहे. मुलायमसिंह यांचे बंधू अभय राम यांची ती मोठी मुलगी आहे.
- अभय राम यांना दोन मुले आणि पाच मुली आहेत.
- अभय राम यांचा एक मुलगा धर्मेंद्र खासदार आहे तर दुसऱ्या मुलाचे नाव अनुराग यादव आहे.
- शीला, सुनीता, नीलम, संध्या आणि लक्ष्मी या पाच मुली आहेत.
- शीला यांचे लग्न राकेश यादव यांच्याशी झाले. त्यांची शैक्षणिक संस्था आहे.
- शीला यादव जसवंतनगर जिल्हा परिषद सदस्य आहेत.
- राहुलची बहिण सोनी एमबीबीएस, एमडी आहे.
पुढील स्लाईडवर बघा, राहुल आणि ईशा यांचे साखरपुड्यातील काही फोटो....