आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 10 लोकांचा होरपळून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतापगड (उत्तर प्रदेश)- प्रतापगड येथील नगर कोतवाली बाबागंज परिसरातील हॉटेल गोयल रेजिडेंसीमध्ये आज (शुक्रवार) सकाळी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यात 10 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून 22 गंभीररीत्या भाजले गेले आहेत. सात लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. बिझनेसमन सुनील गोयल यांच्या मालकिचे हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर आयर्न रेस्तरॉं आहे.
घटनास्थळी पोहोचल्या अग्निशमन दलाच्या गाड्या
घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाच्या चार गाड्या पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांना अलाहाबाद येथे पाठविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अमृत त्रिपाठी आणि पोलिस आयुक्त घटनास्थळी आले आहेत. यावेळी त्रिपाठी यांनी सांगितले, की शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात 10 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्रतापगडचे बृजेश कुमार, अलाहाबादचे मनोज शर्मा, भोपाळचे बसंत शिंदे आणि झारखंडचे सुशील कुमार यांचा यात मृत्यू झाला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे फोटो... आग अशी आटोक्यात आणण्यात येत आहे....