(फोटो ओळ- मीनाक्षी आणि मनिषचा फोटो.)
उज्जैन- व्हॉट्सअॅपवर मीनाक्षी आणि हनीफची ओळख झाली. त्यानंतर दोघे प्रेमात पडले. पण मीनाक्षीचे लग्न झाले होते. त्यामुळे हनीफशी लग्न करणे काही शक्य नव्हते. त्यावर दोघांनी अगदी जालिम उपाय शोधला. दोघांनी मीनाक्षीचा पती मनिषचा काटा काढण्याचा कट रचला. तो अंमलात आणला. पण अखेर बिंग फुटले. पोलिसांनी मनीषच्या हत्येमागील नेमके कारण शोधून काढले. आणि सगळेच प्रकरण उघडकीस आले.
असे आहे प्रकरण
18 ऑगस्ट रोजी मनीष मीणा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिस या हत्येमागचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेत होते. हत्या झाल्याच्या तीन दिवसांनी मीनाक्षी पोलिस स्टेशनमध्ये गेली. तिने चक्क ड्रामा केला. पतीच्या खुन्याला पकडा असे म्हणत ती पोलिस स्टेशनसमोर आंदोलनाला बसली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात हनीफ नावाचा तरुण समोर आला. त्यानंतर पोलिसांनी मीनाक्षीच्या एनजीओ कार्यालयावर छापा मारला. त्यावेळी कार्यालयात हनीफ आणि इतर स्टाफ होता. पोलिसांनी बघितल्यावर हनीफने मोबाईलमधील मेमरी कार्ड आणि सीम कार्ड तोंडात टाकले. त्याला दोन्ही नष्ट करायचे होते. पण पोलिसांनी त्याला पकडून ते जप्त केले. त्याला अटक केली.
पोलिसांनी मीनाक्षी, गोळ्या झाडणारा हनीफ, त्याचा साथिदार रिजवान आणि एकाला अटक केली. मीनाक्षीच्या सासूसासऱ्यांना जेव्हा समजले, की मीनाक्षीने मनीषची हत्या केली आहे त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. अखेर पोलिसांनी त्यांच्यासमोर सगळे पुरावे ठेवले. त्यानंतर मीनाक्षीचा खरा चेहरा समोर आला.
व्हॉट्सअॅपवर झाली होती दोस्ती
मनीष आणि मीनाक्षीचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर मीनाक्षी हनीफच्या प्रेमात पडली होती. तिनेच त्याला एनजीओत नोकरी मिळवून दिली होती. दोघांना काही दिवसांपूर्वी एक इमारतीत आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले होते. याची माहिती मनीषला मिळाली होती. त्यानंतर त्याने मीनाक्षीला घरी आणून बेदम मारले होते. त्यानंतर दोघांमध्ये कायम कडाक्याची भांडणे व्हायची. मनीषने मीनाक्षीला धमकावले होते, की माझे काही मित्र जेलमध्ये बंद आहेत. ते बाहेर आल्यावर मी हनीफची हत्या करेल. तेव्हापासून दोघे मनीषचा काटा काढण्याची संधी शोधत होते.
अशी केली हत्या
ऑफिसला जाण्यापूर्वी मनीष कुठे चहा घेतो. कुठे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्याचा ऑफिसला जाण्याचा मार्ग कोणता याची रेकी हनीफने केली होती. घटनेच्या दिवशी त्याने मनीषचा पाठलाग केला. चहा घेतल्यावर एका गल्लीतून जात असताना हनीफने मनीषवर मागून गोळीबार केला. यात मनीषचा जागीच मृत्यू झाला. यावेळी हनीफचा साथिदार रिजवान सोबत होता. त्यानंतर दोघे पळून गेले. त्यांनी मीनाक्षीला फोन करुन काम झाल्याचे सांगितले. त्यानंतर ऑफिसला जाऊन काम करीत बसले.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मीनाक्षीचे अश्लिल फोटो बघून सासूसासरे यांचा डोळ्यांवर विश्वास बसेना...