आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावती दलित नव्हे, दौलत की बेटी, पैसे घेऊन तिकीट वाटल्‍याचा बसपा खासदाराचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार जुगल किशोर यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्यावर त्या दलित की बेटी नव्हे तर दौलत की बेटी असल्याचा आरोप केला आहे. मायावतींना पावलोपावली पैसा लागतो. पैसे घेऊन त्यात तिकट वाटप करतात, अशी टीका जुगल किशोर यांनी केली आहे. मायावतींवर दौलत की बेटी असल्याचे आरोप याआधीही झालेले आहेत. परंतु त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्याने अशा स्वरुपाचे आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी पक्षाचे आणखी एक सरचिटणीस अखलिश दाय यांनीही मायावतींना असाच आरोप केला होता.

जुगल किशोर हे बसपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. दिल्ली व बिहारचे ते पक्ष प्रभारी आहेत. ते म्हणाले की, काशीराम यांनी तयार केलेले मिशन विकण्याचे काम मायावतींनी सुरू केले आहे. तिकिट वाटपाच्या माध्यामातून त्या स्वत:चे खिसे भरत आहेत. दलितांकडून त्या ५० लाख रुपये तर सामान्यांकडून अडीच कोटी रुपये घेऊन त्या तिकिट वाटतात. त्यांनी माझ्याकडेही पैशाची मागणी केली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नेते भाजपमध्ये जाणार
उत्तर प्रदेशात बसपा प्रमुख मायावती आपली पारंपरिक दलित व्होट बँक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु पक्षातील दलित नेत्यांचा एक मोठ गट त्यांच्यावर नाराज असून तो भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जुगल किशोर हेदेखील गेल्या दोन महिन्यांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. पूर्व व मध्य उत्तर प्रदेशात दलित नेते व समाजात त्यांचे चांगले वजन आहे. त्यांच्यासोबत एक पूर्ण टीम काम करते. त्यांनी पक्षबदल केल्यास ही टीमही त्यांच्यासोबत जाऊ शकते.