आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MEER Groom Rejected Shemale Bride Ghaziabad Uttar Pradesh

घुंगट उचलले नि आपली बायको बाईच नाही कळले; त्‍याने दिला \'त्‍याला\' घटस्‍फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाजियाबाद (उत्तर प्रदेश) - तिचं रुप पाहून तो भाळला. याच मुलीसोबत लग्‍न करायचंय म्‍हणून हट्ट धरून बसला. सुरुवातीला घरच्‍यांनी विरोध केला. पण, आपल्‍या लाडक्‍या पोराची आवड तीच आपली आवड म्‍हणत त्‍यांनी अडत नडत होकार भरला. एकदाचं लग्‍न झालं. पहिल्‍या रात्रीसाठी शेज सजली. तिचं 'घुंगट' कसं काढावं. काय करावं. या विचारानं त्‍याच्‍या मनात गुलगुदल्‍या होत होत्‍या. तो आत गेला. काळजाची स्‍पंदनं वाढली. पण... पण आपली पत्‍नी तर बाईच नाही, हे त्‍याला कळलं. हा प्रसंग घडला तो मुरादनगर (जि. गाजियाबाद) गावात. नंतर प्रकरण जात पंचायतीत गेलं. मुलीला थोडेफार पैसे देऊन सोडचिठ्ठी देण्‍याचा निर्वाळा पंचांनी दिला.

कसे जुळले दोघांचे सूत

मुरादनगरच्‍या एक कंपनीमध्‍ये एक मुलगा आणि मुलगी नोकरी करत होते. सुरुवातीला मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात. थोड्याफार कौटुंबिक विरोधानंतर मुलांच्‍या आईवडिलांनी तिला सून म्‍हणून मान्‍यता दिली. सोमवारी दोघांचा नोंदणी पतद्धतीनेविवाह झाला. आपली बायको ही बाईच नाही, हे पहिल्‍याच रात्री मुलाला कळाले. त्‍यानंतर त्‍याच्‍या रागाचा पारा चढला. मुलीनेही आपण तृतीयपंथी असल्‍याचे मान्‍य केले. शुक्रवारी यावर जात पंचायत बोलावली गेली. मुलीला बायको म्‍हणून स्‍वीकारण्‍यास मुलाने विरोध केला. त्‍यानंतर मुलीला थोडेफार पैसे देऊन सोडचिठ्ठी देण्‍याचा निर्वाळा पंचांनी दिला्.