(फोटो- राजेंद्र प्रसाद घाटावर गंगा आरती करताना मुकेश अंबानी आणि पत्नी नीता.)
वाराणसी- पत्नी नीता यांचा 51 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी सर्वांत श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी कुटुंबीयांसह वाराणसीला गेले आहेत. त्यांच्यासोबत विशेष आमंत्रित 50 पाहुणे असून यात बॉलिवूड, क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणाशी संबंधित व्यक्ती आहेत. राजेंद्र प्रसाद घाटावर नीता यांच्या हस्ते गंगा आरती करण्यात आली.
अंबानी कुटुंबीयांची दोन चार्टड विमाने काशीत आली. सर्वांत आधी मुकेश यांची आई
किकोलाबेन विमानातून उतरल्या. यावेळी विमानतळावर 6 बीएमडब्ल्यू, 8 मर्सिडीज गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय पाहुण्यांसाठी 50 लग्जरी गाड्या होत्या. रात्री आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक कलाकार सादरीकरण करणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यावर सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अंबानी कुटुंंबीयांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुमारे तासभर अंबानी कुटुंबीय येथे थांबले होते. यावेळी मुकेश आणि नीता यांना बघण्यासाठी मंदिराबाहेर बरीच गर्दी जमली होती. नागरिकांनी नीता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पाहुण्यांसाठी नादेसर पॅलेसमध्ये 10 खोल्या आणि 30 सुएट बुक करण्यात आले आहेत. त्यावर 25 लाख रुपये खर्च झाला आहे. काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यावर अंबानी कुटुंबीयांनी राजेंद्र प्रसाद घाटावर गंगा आरती केली. यासाठी मंदिर आणि घाटांवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात आला. या घाटावर पहिल्यांदाच लाकडी शिड्या तयार करण्यात आल्या होत्या.
नीता अंबानी यांच्या वाढदिवसासाठी स्पेशल मलाई केक तयार करण्यात आला. वाराणसी येथील प्रसिद्ध हलवाई राजबंधू मिष्ठान भंडार यांनी केक तयार केला आहे. केकला वेगवेगळ्या रंगातील माव्याची सुंदर सजावट करण्यात आली आहे. याशिवाय पाहुण्यांसाठी माव्याच्या वेगवेगळ्या मिठाई तयार करण्यात आल्या आहेत.
PHOTOS BY: OP MISHRA
पुढील स्लाईडवर बघा, नीता यांच्यासह अंबानी कुटुंबीयांनी कशी केली गंगा आरती...शेवटच्या स्लाईडवर बघा नीता अंबानी यांच्यासाठी तयार करण्यात आलेला स्पेशल मलाई केक... बघा फोटो आणि व्हिडिओ...